
पुणे : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने चांदणी चौकात सुरू असलेल्या पादचारी पुलाचे काम सुमारे वर्षभरापासून सुरूच आहे. सध्या केवळ खांबांच्या पायाचे काम झाले आहे. डिसेंबर २०२४ अखेर काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, सात महिने उलटून ही काम अद्याप सुरूच आहे. मुख्य पुलाच्या कामाला अद्याप सुरुवातदेखील झालेली नाही. या रस्त्यावर पादचारी जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडत आहेत. एखादा अपघात घडल्यानंतरच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला जाग येणार आहे का? असा प्रश्न पादचाऱ्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे.