Pune Traffic: बंदी असूनही जड वाहने रस्त्यावर, वाहतूक कोंडीमुळे नागरिक हैराण

latest Pune News: तीन किलोमीटरचे अंतर पार करायला वाहनचालकांना तब्बल दोन तास लागले.
Pune Traffic: बंदी असूनही जड वाहने रस्त्यावर, वाहतूक कोंडीमुळे नागरिक हैराण
Updated on: 

Vadgoan sheri : बंदी असूनही सायंकाळी जड वाहणे रस्त्यावर येत असल्यामुळे शुक्रवारी सायंकाळी नगर रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. शिवाय अनेक मोठ्या चौकातील सिग्नल बंद होते. वाहतूक पोलीसही रस्त्यावर नव्हते. त्यामुळे तीन किलोमीटरचे अंतर पार करायला वाहनचालकांना तब्बल दोन तास लागले.

बंदी असल्याचे माहित असूनही पोलीस दुर्लक्ष करीत असल्यामुळे या रहदारीत ट्रक, टँकर, क्रेन ,सिमेंटचे मिक्सर, डंपर सर्रास रस्त्यावर दिसत होते. जकात नाका चौकात अनेक खाजगी ट्रॅव्हलच्या बस रस्त्यावर येऊन अडकल्या होत्या. डंपर आणि मिक्सर चे चालक इतर खाजगी वाहन चालकांना दमदाटी करून वाहने घुसवत होते.

Loading content, please wait...