औंध : सूस गावाच्या मुख्य प्रवेशद्वारासह अंतर्गत रस्त्यांवर हातगाड्यांचे अतिक्रमण वाढल्याने नागरिकांना दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. महापालिका प्रशासनाने अतिक्रमणे हटवून वाहतुकीसाठी रस्ता मोकळा करून द्यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे..महामार्ग ते सनीज वर्ल्डदरम्यानच्या मुख्य रस्त्यावर भाजीपाला व खाद्यपदार्थ विकणाऱ्या हातगाड्यांनी अतिक्रमण केल्याने रस्ता अरुंद झाला असून, महापालिकेच्या कर संकलन कार्यालयाच्या परिसरात व आजूबाजूच्या मोकळ्या जागांमध्ये हातगाड्यांनी ठाण मांडले आहे. त्यामुळे या भागातील वाहतूक दिवसेंदिवस विस्कळित होत आहे. हातगाड्यांवर खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांची गर्दी आणि त्यांच्या दुचाकी, चारचाकी वाहनांमुळे मुख्य रस्त्यावर वाहतुकीचा वेग मंदावतो. परिणामी, वाहनांची रांग लागत असून, नागरिक त्रस्त झाले आहेत..गावात ग्रामपंचायतीचा कार्यकाळ असताना रहदारी मर्यादित होती. त्यामुळे अतिक्रमणांचा मोठा परिणाम जाणवत नव्हता. मात्र, सूसच्या पश्चिम भागात वेगाने होणारे नागरीकरण, शैक्षणिक संस्थांची वाढती संख्या आणि निवासी प्रकल्पांमुळे रहदारीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. याबरोबरच सूस गावातील अंतर्गत रस्त्यावरही दिवसेंदिवस वाढत चाललेल्या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनत आहे. काही ठिकाणी हातगाड्या रस्त्यावरच लावण्यात येत असून, अनेक वाहनचालक रस्त्याच्या कडेला वेडीवाकडी वाहने उभी करत आहेत. त्यामुळे वाहनधारकांसह पादचाऱ्यांनाही मनस्ताप सहन करावा लागत आहे..आंदोलनाचा इशारागावातील मुख्य बाजारपेठ आणि शाळेजवळील परिसरात विशेषतः ही समस्या अधिक तीव्र आहे. सकाळी आणि सायंकाळी शालेय व कार्यालयीन वेळांमध्ये वाहतूक अक्षरशः ठप्प होते. महिला, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना रस्त्याने चालणेही कठीण बनले आहे. नागरिकांनी या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधून दिले असून, तातडीने कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशाराही दिला आहे. रोजच वाहतूक कोंडीची समस्या भेडसावत असून, कित्येकदा किरकोळ अपघातही घडले आहेत..गावठाण भागात रस्त्याच्या दुतर्फा पूर्वीपासून ग्रामस्थांचे व्यवसाय सुरू असल्यामुळे रस्ता रुंदीकरणामध्ये अडथळा निर्माण होतो. महापालिकेने योग्य मोबदला दिला, तर ग्रामस्थ रस्ता रुंदीकरणासाठी नक्कीच सहकार्य करतील. यामुळे गावाच्या विकासालाही गती मिळेल आणि वाहतूक कोंडीचा प्रश्नही सुटेल.अनिकेत चांदेरे, स्थानिक रहिवासी.नागरिकांच्या तक्रारीनुसार सूस गाव येथे आवश्यक तेथे येत्या आठवड्यात अतिक्रमण कारवाई करण्यात येईल.- पंकज आव्हाड, सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक,औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालय.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.