Pune Traffic : कोथरूडमधील पदपथ, सायकल मार्ग अतिक्रमणांनी व्यापले; महापालिकेकडून ठोस उपाययोजनांची मागणी
Kothrud News : कोथरूडमधील पदपथ, सायकल मार्ग अतिक्रमणांनी गिळंकृत झाले असून, रस्त्यांवरील वाहतूक कोंडी वाढली आहे. स्थानिक नागरिकांनी महापालिकेकडे तातडीने कारवाईची मागणी केली आहे.
कोथरूड : परिसरातील पदपथ, सायकल मार्ग अतिक्रमणांनी गिळंकृत केले आहेत. त्यामुळे नागरिकांच्या सुविधेसाठी राबविलेल्या उपाययोजना अडचणीच्या ठरत आहेत. त्याचा फायदा कमी आणि नुकसान जास्त असा प्रश्न स्थानिकांकडून उपस्थित होत आहे.