
पुणे : आचार्य आनंदऋषीजी महाराज चौकात (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक) उभारण्यात येत असलेल्या पुलाची औंधकडून शिवाजीनगरच्या दिशेने येणारी मार्गिका वाहतुकीसाठी नुकतीच खुली करण्यात आली. संपूर्ण उड्डाणपुलाचे काम पूर्ण होण्यास आणखी काही कालावधी लागणार आहे.