Pune : ट्रक-बसचा अपघात! चांदणी चौक परिसरात लागल्या वाहनांच्या रांगा

Traffic
Trafficsakal

पुणे : चांदणी चौक परिसरात वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबई-पुणे- सातारा रस्ता आणि पाषाणहून चांदणी चौकाकडे येणाऱ्या वाहनचालकांना वाहतूक कोंडीत अडकून पडल्यामुळे मनःस्ताप सहन करावा लागला. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिस प्रयत्न करीत असून, वाहतूक कोंडी दूर होण्यासाठी आणखी काही अवधी लागणार आहे.

Traffic
Cotton Farmer : दरवाढ नाहीच! पांढरं सोनं कवडीमोल झाल्याने, आहे त्या दरात कापूस विक्री

चांदणी चौकापासून दीड किलोमीटर पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत सातारा रस्त्यावरील लेन येथे ट्रक आणि बसचा अपघात झाला आहे.

या अपघातामुळे झालेल्या कोंडीत सकाळी कामावर निघालेल्या कर्मचाऱ्यांना वाहतूक कोंडी अडकून पडावे लागले. पिंपरी चिंचवड पोलिस, बावधन वाहतूक विभागाकडून अपघातग्रस्त वाहने काढून घेण्यात येत आहेत, अशी माहिती शहर वाहतूक शाखेच्या वारजे विभागाचे सहायक पोलिस निरीक्षक पवार यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com