
कर्वेनगर : नानासाहेब बराटे उड्डाण पुलाजवळील मुख्य रस्त्यावर सोमवारी (ता. ४) सकाळी एक प्रवासी रिक्षा उघड्या लोखंडी चेंबरमध्ये अडकल्याने इतर वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता, तसेच बराच वेळ वाहतूक विस्कळित झाली होती. कर्वेनगर परिसरात वारंवार अशा घटना घडत असून या ठिकाणी नेहमीच लहान-मोठे अपघात होत असल्याचे नागरिकांनी सांगितले. तसेच या भागातील चेंबरची तुटलेली झाकणे लोखंडी जाळ्यांसह पावसाळी वाहिन्यांची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणीही केली जात आहे.