

Pune Traffic Violation Action 42 Lakh
sakal
पुणे : शहरात वाहतूक कोंडी, अपघात रोखण्यासाठी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर आळा घालण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. २०२३ ते २३ डिसेंबर २०२५ या तीन वर्षांच्या कालावधीत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ४२ लाख ६६ हजार वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली असून, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. दरवर्षी कारवाईचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे चित्र आहे.
वाहतूक शाखेच्या आकडेवारीनुसार, २०२३ मध्ये १० लाख ९२ हजार ६७९, २०२४ मध्ये ११ लाख ८६ हजार ८४, तर २०२५ मध्ये १९ लाख ८७ हजार २५६ वाहतूक नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. नो एंट्री व वन-वे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून, तीन वर्षांत सर्वाधिक एकूण सात लाख ८८१ प्रकरणे नोंदली गेली आहेत. २०२५ मध्येच पाच लाख १,६६७ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे.