

पुणेकर सावधान! उद्या मध्यवर्ती भागात वाहतुकीत मोठे बदल; काळभैरवनाथ ते छोटा शेख सल्लाह दर्गा मिरवणुकीमुळे पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
sakal
पुणे : काळभैरवनाथ मंदिर ते छोटा शेख सल्लाह दर्गा या मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील मध्यवर्ती भागात गुरुवारी (ता. २३) वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात येणार आहेत.नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन प्रभारी वाहतूक पोलिस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी केले आहे.