Pune Crime News : पुणे शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली असून वाहतूक शाखेतील पोलीस हवालदाराने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण पोलिस दलात (Pune Police) खळबळ उडाली आहे. राजेंद्र विलास गायकवाड (वय ४२) असे आत्महत्या केलेल्या पोलिसाचे नाव आहे. ते पुणे शहर वाहतूक शाखेच्या नियंत्रण कक्षात कार्यरत होते.