

Pune Shiv Jayanti traffic changes
esakal
पुणे : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शुक्रवारी (ता. ६) शहरातील मध्यवर्ती भागात मिरवणुका निघणार असल्याने वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. लक्ष्मी रस्ता- छत्रपती शिवाजी महाराज रस्ता परिसरात आणि आसपासच्या मार्गांवर सकाळी सात वाजल्यापासून गर्दी ओसरेपर्यंत काही मार्गांवरील वाहतूक वळविण्यात येणार आहे, अशी माहिती वाहतूक विभागाने दिली.