

Pune ranks 5th globally traffic congestion
esakal
TomTom Traffic Index 2025 Report: शहरातील वाहतूक कोंडीच्या बाबतीत पुणेकरांची कायम तक्रार असते. काहीही केलं तरी ट्रॅफिकच्या समस्येतून पुणेकरांची मुक्तता होताना दिसून येत नाही. विशेष म्हणजे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये नागरिकांना जास्तीचा मनस्ताप सहन करावा लागतो. वाहतूक कोंडीमध्ये पुणे शहर जगात पाचव्या स्थानी असल्याचा अहवाल 'टॉम टॉम' या संस्थेने जाहीर केला आहे.