
Pune Traffic
Sakal
पुणे : बाणेर आणि पाषाण भागाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावर गेल्या अनेक महिन्यांपासून ‘आरएमसी’ (रेडी मिक्स काँक्रिट) मिक्सरमधून सांडलेल्या सिमेंट मिश्रित खडीमुळे रस्ते अपघातांचा धोका वाढला आहे. महापालिका प्रशासनासह वाहतूक पोलिसांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे.