

Traffic rule violations raise road safety concerns in Pune
sakal
पुणे : शहरातील कानाकोपऱ्यात ट्रिपल सीट प्रवास, विरुद्ध दिशेने सुसाट येणारी वाहने, वाहन चालविताना मोबाइलवर बोलणे आणि नंबर प्लेट नसलेल्या संशयास्पद वाहनांचा सुळसुळाट झाला आहे. यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून, वाहतूक शाखेने अशा बेशिस्त वाहनचालकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.