पुणे : अति वेगवान वाहनांमुळे बालकांचे जिवीत धोक्यात

वडगाव बुद्रुकच्या गोसावी वस्तीतील पालक धास्तावले
Pune Wadgaon Budruk high speed vehicles
Pune Wadgaon Budruk high speed vehicles

धायरी : वडगाव बुद्रुक येथील अमर ज्योत मित्र मंडळ ते गोसावी वस्ती येथील मुख्य रस्त्यावर अति वेगाने येणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत असून प्रामुख्याने लहान मले या अपघातांचे बळी ठरत  आहेत.आतपर्यंत रस्त्यावर दहा ते पंधरा छोटे मोठे अपघात झाले आहे. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे गोसावी वस्ती व वडगावातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गोसावी वस्ती चौकात भर रहदारीच्या वेळी वाहतूक पोलीस कधीही नसतात. कुठल्याही प्रकारचे  गतिरोधक ,रंम्बलर नसल्याने वाहनांचा वेग कमी होत नाही. सकाळी व संध्याकाळी मोठ्या प्रमाणावर चाकरमानी याच रस्त्यावरून जा ये करत असल्याने चौक नेहमीच गजबजलेला असतो. तसेच रस्त्याच्या आजूबाजूला घरे असल्याने लहान मुले अचानक रस्त्यावर येतात त्यामुळे देखील अपघात होत आहेत. विशेषतः दुचाकीस्वारांच्या वेगावर कोणते नियंत्रण नसते. बेदरकारपणे वाहने चालवणारे अपघातानंतर पसार होतात. त्याचा भुर्दंड जखमी होणाऱ्यांना सहन करावा लागतो.

केवळ आठ दिवसात या रस्त्यावर दोन लहान मुलांचे अपघात झाले. जान्हवी कोळेकर (वय-५, गोसावी वस्ती, वडगाव बुद्रुक) या चिमुरडीला अपघात होऊन तिच्या चेहऱ्यावर गंभीर जखम झाली. शस्त्रक्रिया करून अकरा टाके घालावे लागले. राजवीर कोळेकर (वय-३) हा देखील अपघात जखमी झाला आहे, परंतु त्याला मुका मार बसण्यावर निभावले. वारंवार होणाऱ्या या अपघातांमध्ये अनेक लहान मुले, वयोवृद्ध, महिला अशांना कमी अधिक जखमी होऊन संकटग्रस्त व्हावे लागत आहे.

अपघाताची कारणे-

●रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात अनधिकृत पार्किंग.

● अनधिकृत स्टॉल

●भाजी मंडई या मुळे रस्ता देखील अरुंद झाला आहे.

●वाहन चालकांनी वेगमार्यद न पाळणे.

अपघात टाळण्यासाठी उपाय-

● वाहतूक पोलीस नेमणे.

● गतिरोधक तयार करणे.

●रस्त्यावर रंम्बलर बसवणे.

●अनधिकृत पार्किंग काढणे.

●वाहन चालकांनी वेग मर्यादा पाळणे.

" माझ्या दोन्ही मुलांचा अपघात झाला आहे. यात माझ्या पाच वर्षांच्या मुलीला चेहऱ्यावर जखम झाली असून तिला अकरा टाके घालण्यात आले आहेत. पोलीस प्रशासनाने यावर उपाय योजना करून अपघात थांबवावेत"

-शेखर कोळेकर (अपघातात जखमी झालेल्या मुलांचे वडील)

"मुख्य खात्याशी बोलणे करून त्या ठिकाणी रंम्बलर बसण्यात येतील.अनधिकृत पार्किंग संदर्भात वाहतूक पोलिसांनी मुख्य खात्याशी पत्रव्यवहार करणे गरजेचे आहे."

-प्रदीप आव्हाड-साह्यक आयुक्त ,सिंहगड क्षेत्रीय कार्यालय..

"वाहन चालकांनी या रस्त्यावरून जाताना वाहने सावकाश चालवावी.सुस्त मनपा आणि पोलीस प्रशासनाने अपघात कमी होण्यासाठी योग्य त्या उपयोजना करणे आवश्यक आहे."

-अविनाश चरवड-सामाजिक कार्यकर्ते.

"मनपाला या विषयी पत्र व्यवहार केला आहे. या ठिकाणी गतिरोधक व रंम्बलर बसविण्यास सांगितले आहे. या परिसरात एक पोलीस कर्मचारी देखील नेमणे आवश्यक आहे."

-शरद दबडे -कार्येध्यक्ष रा.यु.काँ खडकवासला मतदारसंघ.

"मुख्य खात्याशी बोलणे करून त्या ठिकाणी रंम्बलर बसण्यात येतील.अनधिकृत पार्किंग संदर्भात वाहतूक पोलिसांनी मुख्य खात्याशी पत्रव्यवहार करणे गरजेचे आहे."

-प्रदीप आव्हाड-साह्यक आयुक्त ,सिंहगड क्षेत्रीय कार्यालय..

"मी तीन दिवस रजेवर असल्याने गावी आलो आहे. याबाबतीत मला माहिती नाही .परंतु ज्या ठिकाणी अपघात होत आहे. त्याठिकाणी प्रत्यक्ष जाऊन पाहणी करून योग्य ती कारवाई केली जाईल."

-उदय शिंगाडे, पोलिस निरीक्षक ,सिंहगड रस्ता वाहतूक विभाग.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com