
पुणे – सिंहगड रस्त्यावरील विठ्ठलवाडी कमानपासून सुरू होणाऱ्या आणि टाईम थिएटरपर्यंत जाणाऱ्या सुमारे दोन किलोमीटर लांबीच्या उड्डाणपुलाचे उद्घाटन एक मे रोजी मोठ्या थाटामाटात करण्यात आले. या पुलाच्या उद्घाटनानंतर नागरिकांना अपेक्षा होती की वाहनांच्या गर्दीतून मुक्तता मिळेल, मात्र प्रत्यक्षात चित्र उलटच आहे.