
कर्वेनगर : कर्वेनगर वडाचा बस थांबा परिसरात मोकाट जनावरे थेट रस्त्यावर वावरताना दिसून येत आहेत. सकाळी-सायंकाळी गर्दीच्या सुमारास गायी आणि बैलांची झुंड मुख्य रस्त्यावर फिरताना दिसत आहे. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहतूक कोंडी तर झाली होतीच, शिवाय अपघाताचा धोकाही निर्माण झाला आहे.