
पुणे : शहरातील बाणेर, पाषाण, सकाळनगर, बालेवाडी, सांगवी, पिंपळे गुरव आणि पिंपरी-चिंचवड परिसरातून हजारो वाहने गणेशखिंड रस्त्यावर आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात येतात. मात्र, वाहतूक पोलिसांकडून पुरेशा नियोजनाच्या अभावामुळे गणेशखिंड रस्ता आणि विद्यापीठ परिसरात दररोज प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. या कोंडीतून मार्ग काढताना वाहनचालकांना मन:स्ताप सहन करावा लागत आहे.