Pune Traffic : पुण्यात भिडे वाडा स्मारकाच्या कामासाठी रात्री वाहतूक बदल

Pune News : भिडे वाडा स्मारक बांधकामामुळे छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर वाहतूक २५ ऑगस्टपर्यंत रात्रीच्या वेळेस पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे.
Pune Traffic
Pune TrafficSakal
Updated on

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील भिडे वाडा स्मारकाच्या बांधकामासाठी हुतात्मा चौकातून स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहे. या भागातील वाहतूक बदल २५ ऑगस्टपर्यंत लागू राहणार आहेत. तर दररोज रात्री दहा ते सकाळी सहापर्यंत या भागातून जाणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळविणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com