Pune Traffic: विश्रांतवाडी चौक ते फुले नगर रस्त्यावरचा बीआरटीमार्ग काढून टाकण्याचा निर्णय; पीएमपीचा विरोध मनपाने झुगारला

How removing the Vishrantwadi BRT will affect 80,000 daily bus commuters in Pune: पुणे शहरातील वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी म्हणून बीआरटी प्रकल्पाची अंमलबजावणी सुरु झाली. सातारा रस्ता, नगर रस्ता, हडपसर रस्ता आणि आळंदी रस्त्यावर टप्प्याटप्प्याने बीआरटी सेवा सुरु झाली.
Private Vehicles Over Public Transit

Private Vehicles Over Public Transit

esakal

Updated on

Pune Vishrantwadi BRT Removal: सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करण्याची वल्गना सर्व राजकीय पक्ष करत असतात. पण कृती मात्र त्याच्या विरोधात केली जाते. आळंदी रस्त्यावरील विश्रांतवाडी चौक ते फुले नगर चौक या दरम्यानचा बीआरटी मार्ग काढून टाकून हा रस्ता खासगी वाहनांना खुला करण्यात येणार आहे. पीएमपीने यास विरोध केलेला असला तरी महापालिका प्रशासन व वाहतूक पोलिसांनी बीआरटी मार्ग काढण्यास अनुकूलता दर्शविल्याने स्थायी समितीमध्ये हा निर्णय घेत खासगी वाहनांसाठी बीआरटीचा बळी देण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com