
पुण्यातील सर्वाधिक वर्दळीचा रस्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फर्ग्युसन कॉलेज (एफसी) रोडवर आता वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आधारित कॅमेरा सिस्टिम करडी नजर ठेवणार आहे. पुणे वाहतूक पोलिसांनी नुकत्याच त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर याबाबत माहिती दिली आहे. या नव्या तंत्रज्ञानामुळे नियम मोडणाऱ्यांना आता सहजासहजी सुटका मिळणार नाही.