Pune Traffic Update : जड वाहनांना वेळा, मार्ग मर्यादित; रेड झोनमध्ये शनिवार, रविवार वाहतुकीस तात्पुरती परवानगी
Weekend Traffic Rules : पुण्यात बांधकाम क्षेत्राशी संबंधित डंपर, मिक्सर आदी जड वाहनांना शनिवार, रविवार आणि १५ ऑगस्ट दिवशी वेळेनिहाय मर्यादित परवानगी; जेसीबी, ट्रॅक्टर यांना संपूर्ण बंदी.
पुणे : शहरातील वाहतूक कोंडी व नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी बांधकाम क्षेत्राशी संबंधित जड वाहनांच्या प्रवेशासाठी नवीन तात्पुरता आदेश जारी करण्यात आला आहे. हा आदेश शनिवार, रविवार आणि १५ ऑगस्ट या दिवसांपुरता मर्यादित असणार आहे.