Pune Traffic Update
esakal
पुणे
Pune Traffic Update: आज पुण्यात बाहेर पडणार असाल तर थांबा! अर्ध शहर बंद, शाळांना सुट्टी, पर्यायी मार्ग कोणते?
Pune cycling event traffic Update: पुणे शहरात आजही आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यामुळे वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. लष्कर, वानवडी, कोंढवा, सिंहगड रस्ता आणि नांदेड सिटी परिसरात रस्ते टप्प्याटप्प्याने बंद ठेवले जाणार आहेत.
पुणे : शहराच्या काही भागात आजही मोठ्या प्रमाणात बंद पाळण्यात येत आहे. शाळांना सुट्टी देण्यात आली असून, वाहतुकीच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण फेरबदल करण्यात आले आहेत. शहरात आयोजित आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्याचे आयोजन होत आहे. या स्पर्धेच्या प्रभावामुळे लष्कर, वानवडी, कोंढवा आणि सिंहगड रस्ता या परिसरातील रस्त्यांवर वाहतुकीसाठी नवीन व्यवस्था लागू करण्यात आली आहे. तसेच, पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या क्षेत्रातील शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
