
बालेवाडी : बाणेर-बालेवाडी परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून वाहतूक कोंडीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. अर्धा किलोमीटरवर जाण्यासाठी नागरिकांना एक तासापेक्षा जास्त कालावधी लागत असल्याने नागरिकांचे घरातून बाहेर पडल्यास मुश्कील झाले आहे. त्यामुळे अमोल बालवडकर सोशल फाउंडेशनकडून या भागासाठी २० ट्रॅफिक वॉर्डनची निवड केली आहे.