Rash Driving : पुण्यात बेशिस्त दुचाकीस्वारांचा वाढता उपद्रव; मोबाईलवर बोलत आणि विरुद्ध दिशेने वाहन चालवणाऱ्यांमुळे अपघातांचा धोका वाढला

Pune Traffic Rule Violations : पुणे शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर पोलिसांची कारवाई सुरू असतानाही बेशिस्तीचे प्रकार कायम आहेत. विरुद्ध दिशेने वाहन चालवणे आणि मोबाईल वापरामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
Pune Traffic Rule Violations

Pune Traffic Rule Violations

sakal
Updated on: 

पुणे : मान वाकडी करून कानाला मोबाईल लावत दुचाकी चालवणे आणि एकेरी मार्गावरून विरुद्ध दिशेने सुसाट वाहन दामटणे, हा बेशिस्त चालकांच्या प्रवासाचा जणू नित्याचाच भाग बनला आहे. अशा दुचाकीस्वारांमुळे शहरात अपघात वाढले असून, पादचारी आणि नियम पाळणाऱ्या नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. इतकेच नव्हे, तर विरुद्ध दिशेने जाण्यास हटकल्यास थेट मारहाण करण्यापर्यंत या चालकांची मजल गेली आहे.

शहर वाहतूक पोलिसांकडून बेशिस्त वाहनचालकांविरुद्ध मोहीम राबवली जात आहे. परंतु या बेशिस्त वाहनचालकांमध्ये सुधारणा झालेली दिसून येत नाही. वाहतूक शाखेकडून प्राप्त आकडेवारीनुसार, चालू वर्षात २३ नोव्हेंबर अखेरपर्यंत विरुद्ध दिशेने आणि ‘नो एन्ट्री’मधून वाहन चालवणाऱ्या पाच लाख ५३ हजार ३८१ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. गतवर्षी २०२५ मध्ये संपूर्ण वर्षभरात ही संख्या पाच लाख १२ हजार ११२ इतकी होती.

Loading content, please wait...