
वारजे : वारजे येथील विनायक हॉस्पिटलसमोरील महामार्गावर दुचाकीस्वारांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन आणि बेफिकीरपणे वाहन चालवण्याचे प्रमाण वाढले आहे. दुचाकीस्वार महामार्गावरील दुभाजक तोडून सेवा रस्त्यावर अनधिकृतपणे प्रवेश करत आहेत. या धोकादायक प्रथेमुळे यापूर्वीही किरकोळ अपघात झाले आहेत आणि मोठ्या अपघातांची शक्यताही वाढली आहे.