
पुणे : गेल्या अनेक वर्षांपासून पुणेकरांचा दाटीवाटीने सुरू असलेला पुणे-मुंबई, मुंबई-पुणे प्रवास आणखी काही महिने तसाच सुरूच राहणार आहे. सीएसएमटी स्थानकावरील ११ व १२ क्रमांकाच्या फलाटांची लांबी वाढविण्याचे काम पूर्ण झाले आहे; मात्र अद्याप ‘आयआरएसडीसी’च्या (इंडियन रेल्वे स्टेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन) वतीने सीएसएमटी स्थानकावरच ‘डेक’ बनविण्याचे काम पूर्ण झालेले नाही. ते पूर्ण झाल्यानंतरच पुण्यातून सुटणाऱ्या रेल्वे गाड्यांचे डबे वाढविले जाणार आहे. मात्र त्यासाठी आणखी किमान दीड ते दोन वर्षे वाट पाहावी लागणार आहे.