
पुणे : पीएमपीचे बसथांबे दिल्लीच्या धर्तीवर तयार केले जाणार आहेत. या थांब्यावर केवळ जाहिरातीच नाही तर प्रवाशांच्या दृष्टीने आवश्यक असलेली माहितीदेखील उपलब्ध केली जाणार आहे. पावसाळ्यात व उन्हाळ्यात हे थांबे प्रवाशांना उपयोगी ठरतील. लवकरच पीएमपीचे पथक दिल्लीच्या बसथांब्यांची माहिती घेण्यासाठी दिल्लीला जाणार आहेत, या संदर्भात ‘पीएमपी’चे अध्यक्ष व पुणे महापालिकेचे आयुक्त यांच्यात चर्चादेखील झाली आहे.