नोटीस देण्यावरून निरीक्षकांमध्ये असंतोष ‘३८ अ’ प्रकरणी सरसकट कारवाई न करण्याची मागणी

नोटीस देण्यावरून  
निरीक्षकांमध्ये असंतोष 
‘३८ अ’ प्रकरणी सरसकट कारवाई न करण्याची मागणी
Published on: 

पुणे, ता. ११ ः व्यावसायिक वाहनांना ‘३८ अ’ अंतर्गत दिलेल्या ‘योग्यता प्रमाणपत्र’ (फिटनेस सर्टिफिकेट) यामध्ये मोठा गैरव्यवहार झाला. या प्रकरणी आतापर्यंत सुमारे ३३२ आरटीओ अधिकाऱ्यांना व निरीक्षकांना नोटीस देण्यात आली. ‘३८ अ’मध्ये योग्यता प्रमाणपत्र कोणी द्यावी, याबाबत परिवहन विभागाने कोणतेही ‘प्रमाणित कार्यपद्धती’ (एसओपी) ठरविलेली नाही, तसेच काही निरीक्षकांनी नियमानुसारच व पारदर्शकपणे काम केले असताना त्यांनादेखील नोटीस बजाविण्यात आली आहे. तेव्हा परिवहन विभागाने सरसकट कारवाई न करता, केवळ दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी मोटार वाहन विभागाच्या कार्यकारी अधिकारी संघटनेनी केली आहे.
वाहन फिटनेस गैरव्यवहार प्रकरणात नेमलेल्या समितीने परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर यांना सादर केलेल्या अहवालात ७३५ आरटीओ अधिकाऱ्यांचा समावेश होता. मात्र, प्रत्यक्षात ३३२ अधिकाऱ्यांना व निरीक्षकांना नोटीस देण्यात आली. यात देखील मोटार वाहन निरीक्षकांची संख्या जास्त आहे. या पार्श्वभूमीवर मोटार वाहन विभागाच्या कार्यकारी अधिकारी संघटनेने परिवहन विभागाचे अप्पर मुख्य सचिव यांना पत्र लिहून सरसकट सर्वांवर कारवाई न करण्याची मागणी केली आहे.
या प्रकरणी परिवहन विभागाचे आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे भेटीची मागणी केली. मात्र, नार्वेकर यांच्याकडून त्यांना कोणताच प्रतिसाद देण्यात आलेला नाही. संघटनेला टाळले जात असल्याने राज्यातील निरीक्षकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.
-----------------
‘‘संघटना कोणत्याही गैरप्रकाराचे समर्थन करत नाही. प्रत्यक्ष गैरप्रकार सिद्ध झाल्यास जरूर कारवाई व्हावी, परंतु केवळ सिस्टीममधील तांत्रिक नोंदी किंवा परराज्यातील अधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष तपासणीतील त्रुटीमुळे सरसकट सर्वावर कारवाई नको.
- दीपक भोंडे, कार्यकारी अधिकारी संघटना, प्रभारी अध्यक्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com