

पुणे, ता. ३१ ः गावात एखादे विकासकाम मंजूर झाले की त्यासोबत किमान चार झाडे लावणे, त्यांचे संगोपन करणे आणि जिओ-टॅगिंगद्वारे त्यांची नोंद ठेवणे बंधनकारक करावे. लावलेली झाडे जगवणाऱ्या गावांना पुढील विकासकामांत प्राधान्य द्यावे, अशी संकल्पना जिल्हा परिषद सदस्या सोनाबाई दाभाडे यांनी मांडली आहे. पाच वर्षांनी मिळणारा पुरस्कार ही एक उपलब्धी असेल; मात्र निसर्ग आणि पर्यावरणात प्रत्यक्ष सकारात्मक बदल घडवून आणणे ही त्याहून मोठी उपलब्धी ठरेल, असे मत त्यांनी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत व्यक्त केले.
अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांना दिलेल्या निवेदनातूनही त्यांनी या मागणीचा पुनरुच्चार केला. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात पुणे जिल्हा परिषदेने राज्यात द्वितीय क्रमांक पटकावल्याबद्दल अभिनंदन करतानाच दाभाडे यांनी जिल्ह्यातील मूलभूत सुविधांच्या प्रश्नांकडे अध्यक्षांचे लक्ष वेधले. विद्यार्थ्यांची गैरसोय निदर्शनास आल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले. शाळा, अंगणवाड्या, आरोग्य उपकेंद्रे आणि पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा परिषद किंवा सीएसआरच्या माध्यमातून तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. मतदारसंघात मोठ्या प्रमाणात पाऊस होऊनही उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण होते. त्यामुळे बंधारे, शिवकालीन टाक्या, तलाव, ग्रामपंचायतींच्या मालकीच्या विहिरी आणि पाइपलाइनची कामे पूर्ण करावीत. तसेच शाळांजवळील दुकानांत होणारी गुटखा, सिगारेट आणि मद्यविक्री रोखण्यासाठी ठोस कारवाई करावी, अशा मागण्याही त्यांनी केल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.