पुणे : पनवेलमधून चोरीला गेलेली दुचाकी हांडेवाडी चौकात पकडली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलीस हवालदार संदीपकुमार गोवेकर आणि महिला पोलीस शिपाई पूजा भोसले हांडेवाडी चौकामध्ये वाहतूक नियमन करीत होते,

पुणे : पनवेलमधून चोरीला गेलेली दुचाकी हांडेवाडी चौकात पकडली

उंड्री: पनवेलमधून चोरीला गेलेली दुचाकी हांडेवाडी चौकामध्ये वाहतूक विभागाच्या पोलिसांनी संशयावरून पकडली. पोलीस हवालदार संदीपकुमार गोवेकर आणि महिला पोलीस शिपाई पूजा भोसले हांडेवाडी चौकामध्ये वाहतूक नियमन करीत होते, त्यावेळी त्यांनी दुचाकीचालकाला संशयावरून थांबवून कागदपत्राची तपासणी करताच चोरीचा गुन्हा उघड झाला.

दरम्यान, पोलिसांनी वाहनाचे सविस्तर शोधून एमएच-43-बीएम-8246 दुचाकी 10 एप्रिल 2022 रोजी पनवेल येथून चोरीला गेल्याचे समजले. पनवेल शहर पोलिसांशी संपर्क साधून गाडीचे मालक रवींद्र जिरवणकर यांना बोलावून दुचाकी दिल्याचे हांडेवाडी वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी गोलांडे यांनी सांगितले. याप्रसंगी पोलीस उपनिरीक्षक सुनील जगदाळे, पोलीस शिपाई महादेव ठाणगे व प्रवीण केदार उपस्थित होते.

Web Title: Pune Two Wheeler Stolen Panvel Caught Handewadi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top