

Pune News
esakal
पुणे: कुपनलिकेचे काम करताना थेट मेट्रोच्या भुयारी मार्गाला छिद्र पडल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला. त्याची गांभीर्याने दखल घेत महापालिका आयुक्तांकडून आता भुयारी मेट्रोच्या मार्गाच्या परिसरात बांधकाम करण्यासाठी नवीन नियमावली केली जाणार आहे. त्यामुळे जुन्या इमारती आणि वाड्यांच्या पुनर्विकासाचे काम व कूपनलिकेच्या कामासाठी महापालिकेची स्वतंत्र परवानगी घ्यावी लागणार आहे.