esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

rain update

पुणे : उंड्री-पिसोळीमध्ये वरुणराजाचे पुन्हा कमबॅक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

उंड्री : वरुणराजाचे एक दिवसाच्या सुटीनंतर पुन्हा कमबॅक जोरदार झाले. दोन दिवसांपूर्वी ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस झाला होता. त्यानंतर काल दिवसभर आणि सकाळपासूनच प्रचंड उकाडा जाणवत होता. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना सायंकाळी पाचच्या सुमारास हलक्या पावसामुळे दिलासा मिळाला.

संजय सातव म्हणाले की, उंड्री, पिसोळी, हांडेवाडी, होळकरवाडी, वडाचीवाडी, औताडेवाडी परिसरात आज हलक्या पावसाने हजेरी लावली. जून महिन्यामध्ये शाळा सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी वरुणराजा हजेरी लावतो. त्याप्रमाणे यावर्षी ऑक्टोबरमध्ये शाळा सुरू झाल्या आणि वरुणराजाने चिमुकल्यांचे जोरदार स्वागत केले. दोन दिवसांपासून ग्रामीणच्या शाळांमध्ये पाचवी ते दहावी आणि शहरी भागातील आठवी ते १२वी पर्यंतचे वर्ग सुरू झाले आहेत. त्यामुळे सायकलवरून घरी जाताना मुलांचे हाल झाले.

loading image
go to top