Pune
Punesakal

Pune : ग्रामीण भागातील खेळाडूंसाठी एक वेगळे व्यासपीठ, बारामतीत राष्ट्रवादी चषकाचे आयोजन

बारामती नगरपालिकेच्या प्रत्येक प्रभागातील खेळाडू व युवक एकत्र येण्यासाठी याचे आयोजन केले असुन प्रभागातील 25 संघानी यामध्ये सहभाग घेतल्याचे शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष अविनाश बांदल यांनी सांगितले.
Published on

Pune - बारामती राष्ट्रवादीच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त येथील बारामती शहर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने राष्ट्रवादी युवक चषक 2023 सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी उदघाटन केले. ग्रामीण भागातील खेळाडूंसाठी एक वेगळे व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याचे काम युवकाध्यक्ष अविनाश बांदल व राष्ट्रवादी युवकच्या टीमच्या माध्यमातून होत असल्याबद्दल प्रदीप गारटकर यांनी समाधान व्यक्त केले.

Pune
Mumbai: लोकल गाड्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची गती धिमी; टॉक बॅक, पॅनीक बटन यंत्रणाही कागदारवरच

बारामती नगरपालिकेच्या प्रत्येक प्रभागातील खेळाडू व युवक एकत्र येण्यासाठी याचे आयोजन केले असुन प्रभागातील 25 संघानी यामध्ये सहभाग घेतल्याचे शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष अविनाश बांदल यांनी सांगितले. याप्रसंगी बारामती तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष संभाजी होळकर, शहराध्यक्ष जय पाटील, अनिता गायकवाड,वनिता बनकर.

Pune
Mumbai News : ...तर जून अखेरनंतर पाणी कपात; सध्या तलावात १६ टक्के पाणीसाठा

धीरज लालबिगे, द्वारका कारंडे, रेश्मा ढोबळे, असिफ बागवान, तानाजी बांदल, अभिजित जाधव, जयसिंग देशमुख नगरसेवक सुधीर पानसरे, तुषार लोखंडे अमोल कावळे अजिनाथ चौधर, आदीत्य हिंगणे, ओंकार जाधव, परवेज सय्यद, अभिजीत घाडगे, विशाल काळे उपस्थित होते. या प्रसंगी शहराध्यक्ष जय पाटील व तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन अनिल सावळेपाटील यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com