

Pune University
sakal
पुणे - राज्यातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने २३ ऑक्टोबर रोजी नियोजित असलेल्या सर्व परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या परीक्षांच्या सुधारित तारखा लवकरच स्वतंत्र परिपत्रकाद्वारे जाहीर केल्या जातील, अशी माहिती विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक प्रा. डॉ. राजेंद्र तलवारे यांनी दिली आहे.