

Pune University
esakal
पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून अनेक महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक निर्णय घेण्यात आले. राज्यातील वाढती दुष्काळी परिस्थिती विचारात घेऊन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भोजनगृहातील प्रस्तावित १० रुपयांची दरवाढ तात्काळ प्रभावाने रद्द करण्याचा निर्णय व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत घेतात आला. तसेच दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना आगामी परीक्षा शुल्क माफ करण्याबाबतही सकारात्मक पाऊल उचलण्यात आले आहे.
विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत विद्यार्थ्यांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून अनेक महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक निर्णय घेण्यात आले.