पुण्यातील विद्यापीठ चौकातील "ते' पूल तीन टप्प्यात पाडणार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 जुलै 2020

पुणे विद्यापीठ चौकातील "ते' पूल एकावेळी न पाडता तीन टप्प्यात पाडण्याचा निर्णय पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने घेतला आहे. तीस दिवसात हे पूल पाडण्याचे नियोजन करण्यात आले असून वाहतूक कोंडीची टाळण्यासाठी चार पर्यायी रस्त्यांचा विचार करण्यात आला आहे. येत्या आठ ते दहा दिवसात हे पूल पाडण्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरूवात होईल, असे सांगितले जात आहे. 

पुणे - विद्यापीठ चौकातील "ते' पूल एकावेळी न पाडता तीन टप्प्यात पाडण्याचा निर्णय पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने घेतला आहे. तीस दिवसात हे पूल पाडण्याचे नियोजन करण्यात आले असून वाहतूक कोंडीची टाळण्यासाठी चार पर्यायी रस्त्यांचा विचार करण्यात आला आहे. येत्या आठ ते दहा दिवसात हे पूल पाडण्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरूवात होईल, असे सांगितले जात आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यान मेट्रो प्रकल्पाचे काम पीएमआरडीएने हाती घेतले आहे. गणेशखिंड रस्त्यावरून ही मेट्रो जाणार आहे. त्यासाठी या रस्त्यावरील पुणे विद्यापीठ आणि ई स्क्वेअर चौकातील उड्डाणपूल अडथळा ठरत आहेत. त्यामुळे हे दोन्ही पूल पाडण्याचे नियोजन पीएमआरडीएकडून करण्यात आले आहे. त्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. तर हे पूल महापालिकेच्या मालकीचे असल्याने ते पाडण्यासंदर्भात दोन दिवसांपूर्वी महापालिकेकडूनही पीएमआरडीएला "एनओसी' देण्यात आली आहे.

पुण्यात घर घ्यायचंय? तर ही बातमी नक्की वाचा! 

दरम्यान आज महापालिका, वाहतूक पोलीस आणि पीएमआरडीचे अधिकारी यांची संयुक्तपणे विद्यापीठाची पाहणी केली. यावेळी पीएमआरडीएचे महानगर नियोजनकार विवेक खरवडकर, सहाय्यक पोलीस आयुक्त नागनाथ वाकुडे, महापालिकेचे दिनकर गोजारी नगरसेवक आदित्य माळवे आणि स्थानिक रहिवाशी यावेळी उपस्थित होते. एकावेळी संपूर्ण पूल न पाडता, तीन टप्प्यात ते पाडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

पुणेकरांच्या बेशिस्तीचे घडले दर्शन; नियम मोडणाऱ्या 'इतक्या' नागरिकांवर गुन्हे दाखल!

सर्वात कमी वाहतूक असलेल्या चतृशृंगी येथील, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात बाणेरकडे जाणारा आणि तिसऱ्या टप्प्यात औंधकडे जाणारा पूल पाडण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे पीएमआरडीकडून यावेळी सांगण्यात आले. पूल पाडताना वाहतूकीस अडथळा ठरू नये, यासाठी नियोजन करण्यात आले आहे. तसेच गणेशखिंड रस्त्यावर वाहतुक सुरळीत ठेवण्यासाठी चार पर्यायी रस्त्यांचा विचार करण्यात आला आहे. त्यांची देखील यावेळी पाहणी करण्यात आली. येत्या आठ ते दहा दिवसात प्रत्यक्षात पूल पाडण्याच्या कामाला सुरूवात करण्यात येणार असल्याचे यावेळी पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिले. 

  • असे आहे पूल पाडण्याचे नियोजन 
  • पहिला टप्पात चतुशृंगी येथे उतारणारा व पाषाणकडे जाणारा भाग 
  • दुसरा टप्पा बाणेरकडे जाणारा 
  • तिसऱ्या टप्पा औंधकडे जाणारा

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune University Chowk Bridge will drop in three step