
Baramati Latest News: येथील विद्या प्रतिष्ठान कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा सन 2025 साठीचा उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार जाहीर झाला आहे.
शैक्षणिक गुणवत्ता वाढ, संशोधन, नवकल्पना, तसेच विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांत मिळालेल्या संधी या सर्व निकषांवर त्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली असल्याने हा पुरस्कार जाहीर झाला आहे.