Pune University
sakal
पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलसचिवपदी डॉ. मनोहर सानप यांची नियुक्ती केल्याची माहिती समोर आली आहे. विद्यापीठ प्रशासनाने नियुक्तीचे आदेश देताना मूळ संस्थेचे ‘ना - हरकत प्रमाणपत्र’ आणि संस्थेने कार्यमुक्त केल्याचे पत्र सादर करण्याची अट टाकली आहे. त्यामुळे डॉ. सानप हे पदभार नेमके कधी स्वीकारणार, हे अद्याप गुलदस्त्यात आहे.