विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात स्पुक्टो.च्या प्राध्यापकांचे धरणे आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pune

विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात स्पुक्टो.च्या प्राध्यापकांचे धरणे आंदोलन

रेंजहिल्स : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठीय व महाविद्यालयीन अध्यापक संघटना आपल्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर धरणे आंदोलन केले. एम. पुक्टो.च्या आदेशान्वये महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठ कार्यक्षेत्रात आंदोलनांची मालिका सुरू करण्यात आलेली होती. महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री व सचिवांना निवेदने सादर करून महाराष्ट्राचे उच्च शिक्षण संचालक,

राज्यातील सर्व विभागीय सहसंचालक व विद्यापीठामध्ये आंदोलने सुरू करण्यात आलेली आहेत. या आंदोलनासाठी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील सुमार ३०० हून अधिक प्राध्यापक उपस्थित होते. दिनांक 18 जुलै 2018 च्या विद्यापीठ अनुदान आयोग रेग्युलेशनची अंमलबजावणी जशीच्या तशी व्हावी, एकरूप परिनियमांची अंमलबजावणी होणेसाठी विद्यापीठाने आग्रही भूमिका घ्यावी, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा 2016 मधील तरतुदीनुसार सर्व अधिकारी मंडळाच्या निवडणुका वेळेत पार पाडाव्यात, शैक्षणिक वर्ष 2022-23 चे शैक्षणिक नियोजन करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे,

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिपत्रक क्र. 284/2022 नुसार शिक्षक मान्यता प्रक्रिया पूर्ण करावी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक भरती त्वरित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा करावा, विद्यापीठाकडे सादर करण्यात आलेले प्राचार्य व प्राध्यापक मान्यतेचे प्रस्ताव तातडीने मान्य करावेत अशा विविध मागण्या यावेळी मांडण्यात आल्या. याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष डॉ. एस. पी. लवांडे, डॉ. के. एल. गिरमकर, प्रा. डॉ. व्ही. एम. शिंदे, प्रा. मगन ताटे, डॉ. प्रवीण ताटे-देशमुख यांनी मार्गदर्शन केले.

Web Title: Pune University For The Fulfillment Of Various Demands

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..