

Pune University Declares Holiday on Monday
sakal
पुणे : जिल्ह्यात होत असलेल्या ‘पुणे ग्रॅंड चॅलेंज टूर २०२६’ या आंतरराष्ट्रीय स्पर्धेनिमित्त जिल्हाधिकारी यांनी संबंधित परिसरातील शाळा, महाविद्यालये, शिक्षण संस्थांना सोमवारी (ता.१९) सुटी जाहीर केली आहे. या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कार्यालयास सोमवारी सुटी जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती विद्यापीठ प्रशासनाने परिपत्रकाद्वारे दिली आहे.