पुणे विद्यापीठाची वसतिगृहे सोमवारपासून उघडणार

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पीएच.डी. आणि स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांची वसतिगृहे सोमवार (ता.२१)पासून खुली करण्यात येणार आहे.
Pune University
Pune UniversitySakal
Updated on
Summary

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पीएच.डी. आणि स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांची वसतिगृहे सोमवार (ता.२१)पासून खुली करण्यात येणार आहे.

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील (Pune University) पीएच.डी. आणि स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांची वसतिगृहे (Hostels) सोमवार (ता. २१) पासून खुली (Open) करण्यात येणार आहे. तर इतर वसतिगृहे आयुक्तांची परवानगीनंतर ५० टक्के उपस्थितीत सुरू होणार आहे.

महाविद्यालयांबरोबरच विद्यापीठातील विभागांचे प्रत्यक्ष वर्ग सुरू झाले आहेत. मात्र राहण्याची व्यवस्था नसल्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. विद्यापीठाने आता यासंबंधी निर्णय घेतला असून, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी यासंबंधी परिपत्रक जारी केले आहे. ते म्‍हणतात,‘‘कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत चालला आहे. त्यामुळे स्वतंत्र खोल्या असलेली पीएच.डी. आणि स्पर्धा परीक्षेची वसतिगृहे सोमवारपासून सर्व नियमांचे पालन करून खुली करण्यात येत आहे. संबंधित विभागप्रमुखांनी विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आणून द्यावे.’’ तसेच विद्यापीठ परिसरातील इतर वसतिगृहे ५० टक्के उपस्थितीत सुरु करण्यात येत असल्याचेही डॉ. पवार यांनी म्हटले आहे.

Pune University
पुणे : नगरसेवकांनी एकमताने मिळकत करवाढ फेटाळून लावली

वसतिगृहे खुली करण्यासाठी आवश्यक सर्व डागडुजी आणि कोरोना संबंधीची तयारी पूर्ण झाली आहे. विभागानुसार वसतिगृहात प्रवेश मिळणाऱ्या विद्यार्थ्यांचीही यादी जाहीर करण्यात आली आहे. पीएच.डी. व स्पर्धा परीक्षा वगळता इतर वसतिगृहांना परवानगी मिळाल्यास वसतिगृहे खुली करण्यासाठी आवश्यक तयारी पूर्ण झाली आहे.

- डॉ. सचिन बल्लाळ, वसतीगृह प्रमुख, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

आकडे बोलतात....

वसतिगृहांचा प्रकार संख्या प्रवेश क्षमता

मुले ९ १३४०

मुली ९ १२२७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Trust Turned Costly: Farmers Lose Lakhs in Fake Sugarcane Labour Racket
Farmer Dies in Severe Storm as Cloudburst-Like Rain Devastates Villages in Pune District
Farmers in Tears as Hailstorm Damages Vineyards and Mango Orchards
Danve Visits Bereaved Families, Says Crime Surge Reflects Failure of Enforcement System
Marathi News Esakal
www.esakal.com