
Pune University
पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यातील महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांच्या परीक्षा येत्या काळात सुरू होणार आहेत. दरम्यान, विद्यापीठामार्फत परीक्षा अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू केली असून परीक्षा शुल्कात २० टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना वाढीव शुल्काचा भार सहन करावा लागणार आहे.