

Pune News
esakal
पुणे: ‘‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात लवकरच ‘स्कूल ऑफ अंडरग्रॅज्युएट स्टडीज’ सुरू करण्याचा मानस आहे. यामध्ये विशिष्ट विषयात अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान पदवी अभ्यासक्रम (बी. ई. आणि बी. टेक.) सुरू करण्याचा विचार आहे. यासाठी भारतीय अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेसमवेत अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत चर्चा झाली आहे. या विषयातील एक अभ्यासक्रम लवकरच सुरू होईल,’’ अशी घोषणा कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी अधिसभेत केली. विद्यापीठात विशिष्ट पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी ही ‘स्वतंत्र प्रशाळा’ स्थापन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.