SPPU University: विद्यापीठात पीएच.डी.च्या जागा वाढणार ;प्रलंबित संशोधन नोंदणीचा आढावा; एक हजार जागा उपलब्ध होण्याची शक्यता

SPPU University PhD Admission: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून २०२० पूर्वी नोंदणी केलेल्या पीएच.डी. संशोधकांच्या प्रलंबित कामांची पडताळणी सुरू असून, एक हजारांहून अधिक जागा नव्या प्रवेशासाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
 Savitribai Phule Pune University reviews pending PhD registrations to identify seats for fresh admissions.

Savitribai Phule Pune University reviews pending PhD registrations to identify seats for fresh admissions.

esakal

Updated on: 

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने प्रदीर्घ काळापासून पीएच.डी. संशोधन प्रलंबित असलेल्या विद्यार्थी संशोधकांच्या नोंदणीचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. २०२० पूर्वी नोंदणी केलेल्या; मात्र अद्याप प्रबंध पूर्ण न केलेल्या संशोधकांच्या कामाची सखोल पडताळणी केली जात आहे. या प्रक्रियेमुळे विद्यापीठांतर्गत पीएच.डी. अभ्यासक्रमाच्या एक हजारांहून अधिक जागा नव्याने प्रवेशासाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...