Pune University Exam : मोठी बातमी! पुणे विद्यापीठाच्या गुरुवारी होणारी हिवाळी सत्र परीक्षा पुढे ढकलली
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या हिवाळी सत्र परीक्षा २०२५ मधील नियोजित विविध अभ्यासक्रमांच्या गुरुवारी होणाऱ्या दोन्ही सत्रातील परीक्षा पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत.
पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमाच्या गुरुवारी (ता. २९) होणाऱ्या हिवाळी सत्र परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. विद्यापीठाने परिपत्रक काढून याबाबत बुधवारी माहिती दिली.