अंतिम वर्षाच्या परिक्षेच्या दुसऱ्या दिवशी ऑफलाइन सुरळीत पण, ऑनलाइन अडखळत

ब्रिजमोहन पाटील
Tuesday, 13 October 2020

सोमवारी विद्यापीठाची परीक्षा सुरू झाल्यानंतर ऑफलाइन परीक्षेचे वेळापत्रक कोलमडून गेले होते. नियोजित वेळापत्रकापेक्षा अडीच ते तीन तास उशिरा पेपर सुरू झाले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला. आज दुसऱ्या दिवशी ऑफलाइन परीक्षा वेळेत सुरू झाली. ऑनलाइन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मात्र आज पुन्हा एकदा तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागत होते

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षांमध्ये दुसऱ्या दिवशी ऑफलाइन परीक्षा सुरळीत सुरु झाली. तर, ऑनलाइन परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामध्ये विशिष्ट इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना मराठी प्रश्न विचारणे, फक्त प्रश्नाचे पर्याय दिसणे यासह इतर अडचणीमुळे विद्यार्थी हैरान झाले आहेत. 

सोमवारी विद्यापीठाची परीक्षा सुरू झाल्यानंतर ऑफलाइन परीक्षेचे वेळापत्रक कोलमडून गेले होते. नियोजित वेळापत्रकापेक्षा अडीच ते तीन तास उशिरा पेपर सुरू झाले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला. आज दुसऱ्या दिवशी ऑफलाइन परीक्षा वेळेत सुरू झाली. विद्यापीठाकडून सकाळी साडेनऊच्या सुमारास प्रश्नपत्रिका व ओटीपी पाठवण्यात आला त्यानंतर विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकांचे वाटप करण्यात आले. आज कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही असे काही परीक्षा केंद्र असलेल्या महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी सांगितले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ऑनलाइन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना आज पुन्हा एकदा तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागत होते. निलेश महिंद्रकर म्हणाला, माझा अर्थशास्त्रचा पेपर इंग्रजी मधून येणे अपेक्षित होते, पण तो मराठीतून प्रश्न आल्याने ते समजण्यास अवघड जात होते. विद्यापीठाच्या हेल्पलाइनची अनेकदा संपर्क साधला पण माझा कॉल लागला नाही. त्यामुळे अनेक प्रश्‍न सोडवायचे राहून गेले आहेत. हे नुकसान कसे भरून काढणार. 

शुभम राठोड म्हणाला, माझा एमएससी इलेक्ट्रॉनिक बॅकलाॅगचा पेपर होता पण लॉगिन केलं तर गणिताचाचा पेपर आला. विद्यापीठाच्या हेल्पलाइनची वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण संपर्क होऊ शकला नाही. ठरलेल्या वेळापत्रक शिवाय दुसरा पेपर आल्याने गोंधळ झाला आहे. टेक्निकल प्रॉब्लेम मुळे नुकसान होण्याची शक्यता आहे, विद्यार्थ्यांना दिलासा दिला पाहिजे. 

क्षमता १२०० प्रवाशांची अन्‌ प्रवास केला फक्त १५ प्रवाशांनी

सोशल मीडियावर ऑनलाइन परीक्षेच्या तक्रारींचा पाऊस पाडला. विद्यापीठाच्या हेल्पलाईनवर संपर्क होत नसल्याने विद्यार्थ्यांनी ट्विटरवर त्यांच्या अडचणी मांडल्या. अनेकांनी ऑनलाइन परीक्षा देताना स्क्रीनशॉट व फोटो काढून  पुराव्यासह तक्रारी केल्या आहेत. 

जंबो कोविड सेंटरमधील तंबू अग्निरोधक 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In pune university On the second day of the final year offline exams were smooth but online exams were stumbling