

पुणे : एखाद्या चित्रपट, परिकथा किंवा माहितीपटातील दृश्य आहे, असे तुम्हाला वाटलं असेल, तर जरा थांबा. हे कोणत्याही चित्रपटातील किंवा तत्सम कथेतील दृश्य नाही! तर ही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ‘स्मार्ट इंटरव्ह्यू प्लॅटफॉर्म’ या व्यासपीठाची संकल्पना आहे. होय, नोकरीसाठी तयारी करत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाने हे नवीन व्यासपीठ तयार केले आहे. या व्यासपीठाद्वारे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या जातील आणि त्या अनेक कंपन्यांना पाठविण्यात येणार आहेत.
विद्यापीठ आणि पिंपरी चिंचवड महापालिकेचा स्मार्ट सिटी प्रकल्प यांच्या एकत्रित प्रयत्नातून ‘स्टिक’ उपक्रमांतर्गत ही संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना रोजगार मिळण्याच्या दृष्टीने त्यांना आवश्यक कौशल्ये याद्वारे देण्यात येतील. तसेच या व्यासपीठाद्वारे विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर देखील संधी निर्माण होण्यास मदत होणार आहे. या उपक्रमाचे उद्घाटन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते झाले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, इनोव्हेशन सेलच्या प्रमुख डॉ. अपूर्वा पालकर, अधिष्ठाता डॉ. संजीव सोनवणे, डॉ. मनोहर चासकर, डॉ. पराग काळकर, अधिसभा सदस्य संतोष ढोरे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाला पिंपरी-चिंचवड शहरातील विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक आणि प्लेसमेंट ऑफिसर उपस्थित होते.
डॉ. पालकर म्हणाल्या, ‘‘सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना हे व्यासपीठ विनामूल्य वापरता येणार आहे. या अंतर्गत तीनशेहून अधिक कंपन्या जोडलेल्या आहेत. तसेच लवकरच डिग्री प्लस व्यासपीठावर सुद्धा हा उपक्रम नाममात्र शुल्कात सुरू करण्यात येईल.’’
‘‘रोबो किंवा मशिनद्वारे विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्यात येतील. त्याद्वारे विद्यार्थ्यांना विविध कंपन्यांमध्ये नोकरी करण्याची संधी मिळू शकणार आहे. जग सातत्याने बदलत असताना काल जे घडलं ते आज अभ्यासक्रमात येण्याची गरज आहे. यासाठी विद्यापीठाकडून सिफोरआयफोर, डिग्री प्लस सारखे उपक्रम घेऊन येत आहे. ‘स्मार्ट इंटरव्ह्यू’ हे देखील अशाच प्रकारचे व्यासपीठ असून विद्यार्थ्यांना औद्योगिक क्षेत्रासाठी तयार करण्यासाठी आणि जगातील कंपन्यांशी जोडण्यासाठी त्याची मदत होईल.’’
- डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
‘स्मार्ट इंटरव्ह्यू प्लॅटफॉर्म’चे वैशिष्ट्ये
रोबो किंवा मशीनद्वारे विद्यार्थ्यांच्या मुलाखत होणार
घेतलेल्या मुलाखत अनेक कंपन्यांच्या प्रतिनिधींना पाहता येणार
त्यातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यास मदत
विद्यार्थ्यांना मुलाखतीच्या माध्यमातून कौशल्य विकसित करण्याची संधी मिळणार
रोबो : तुमच्याबद्दल सांगा
विद्यार्थी : माझे नाव*. मी * या शाखेत शिक्षण घेतले असून ** ही कौशल्य आत्मसात केली आहेत.
रोबो : तुमची सर्वात मोठी ताकद काय?
विद्यार्थी : **
रोबो : अभिनंदन, तुमची मुलाखत कंपनीला पाठविण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.