विद्यार्थ्यांवरील गुन्हे तत्काळ मागे घेण्याची मागणी

विद्यार्थ्यांवरील गुन्हे तत्काळ 
मागे घेण्याची मागणी
Published on: 

पुणे, ता. ६ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर १५ जणांवर पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात आले. यात अनेक विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सामाजिक भवितव्याचा विचार करता त्यांच्यावर दाखल केलेले गुन्हे विद्यापीठ प्रशासनाने तत्काळ मागे घ्यावेत, अशी मागणी नॅशनल स्टुडंटस युनियन ऑफ इंडियातर्फे (एनएसयूआय) करण्यात आली.

या मागणीचे निवेदन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांना देण्यात आले. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने काही दिवसांपूर्वी विद्यापीठातील आंदोलनांसंदर्भात केलेला ठराव आणि त्यानुसार परिपत्रक काढण्यात आले. या परिपत्रकाचा विरोध करत विविध संघटनांनी हे परिपत्रक मागे घेण्याची मागणी विद्यापीठाकडे केली. त्यावर विद्यापीठानेही विद्यार्थ्यांच्या मागणीचा सकारात्मक विचार करण्यात येईल, असे आश्वासन दिले. दरम्यान, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बुधवारी झालेल्या बैठकीत आंदोलने, सभा यासंदर्भातील निर्णयावर परिषदेचे सदस्य ठाम होते, परिणामी त्या संदर्भातील परिपत्रक मागे घेण्यात आले नाही. त्या निषेधार्थ विद्यार्थी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीच्या परिसरात जोरदार घोषणाबाजी करत कुलगुरूंची गाडी अडवण्याचा प्रकार घडला. कुलगुरूंच्या गाडीची तोडफोडही करण्यात आली. याप्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल केले आहेत.
विद्यार्थ्यांच्या आंदोलनासंदर्भातील वादग्रस्त ठराव आणि त्याअनुषंगाने जाहीर केलेल्या परिपत्रकाचा पुनर्विचार करावा, विद्यार्थ्यांची बाजू ऐकून घेण्यासाठी विशेष बैठक आयोजित करावी, तसेच विद्यार्थ्यांवर दाखल गुन्हे मागे घेण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने तातडीने पुढाकार घ्यावा, अशा मागण्या ‘एनएसयूआय’ने निवेदनाद्वारे केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.