विज्ञान चित्रपट महोत्सवात विद्यापीठाने मारली बाजी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune University

विज्ञान चित्रपट महोत्सवात विद्यापीठाने मारली बाजी

पुणे - ‘विज्ञान प्रसार’च्या वतीने आयोजित विज्ञान चित्रपट महोत्सवात (Science Film Festival) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने (Pune University) बाजी मारली आहे. विद्यापीठातील शैक्षणिक बहुमाध्यम संशोधन केंद्राने (इएमआरसी) निर्मिलेल्या ‘कमला- द स्वदेसी न्यूट्रीइंडियन’ या माहितीपटाला देशपातळीवर दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. दरवर्षी स्वातंत्र्य दिनानिमित्त स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. १३ व १४ ऑगस्ट रोजी नवी दिल्ली येथे ऑनलाइन पद्धतीने ही स्पर्धा पार पडली.

ईएमआरसीने महिला शास्त्रज्ञ डॉ. कमला सोहोनी यांच्या कार्यावर माहितीपट तयार केला. डॉ. सोहोनी या विज्ञान विषयात केंब्रिज विद्यापीठातून पीएच.डी. करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला शास्त्रज्ञ होत्या. देशातील लोकांना आपल्या संशोधनाचा उपयोग व्हावा, या हेतूने त्या भारतात परतल्या होत्या. भारतीय आहारशास्त्रातील पोषक अन्नद्रव्यांवर त्यांनी मूलभूत संशोधन केले आहे. महितीपटाचे दिग्दर्शन ‘ईएमआरसी’चे संचालक डॉ. समीर सहस्रबुद्धे यांनी केले आहे. सहाय्यक दिग्दर्शन व संकलन मिलिंद पाटील, संशोधन आणि संहिता अजिता देशमुख यांनी लिहिली आहे. तसेच कॅमेरा अप्पा चिंचवडे, ध्वनी राम जाधव व प्रदीप भोसले, सेट निर्मिती राजेश देशमुख आदींनी केली होती.

हेही वाचा: "आघाडीमुळे तिन्ही पक्षांचा श्वास कोंडला, भाजपाला विस्ताराची संधी"

या महितीपटाच्या निमित्ताने डॉ. कमला सोहोनी यांचे भारतासाठीचे योगदान सर्वांसमोर आले आहे. ‘ईएमआरसी’ने केलेले हे काम कौतुकास्पद आहे.

- डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

शिक्षण क्षेत्रातील ज्येष्ठ तज्ज्ञ आणि माझे सहकारी यांनी एकत्रित काम करून अत्यंत थोड्या अवधीत या फिल्मसाठी उत्तम काम केले आहे.

- डॉ. समीर सहस्रबुद्धे, संचालक, इएमआरसी

Web Title: Pune University Wins Science Film Festival

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..